देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, गरज नसताना मंत्र्यांच्या बंगले आणि गाड्यांवर खर्च केला जात आहे. खाजगी उद्योजकांना सरकार आवाहन करतात की, नोकरीवरून कर्मचाऱ्यांना काढू नका, त्यांचे पगार द्या आणि स्वतः सरकारच एसटी कर्मचाऱ्यांना पगार देत नाही.'
'चिट्ठीत सरकार आत्महत्येला जबाबदार असे एस टी कर्मचाऱ्याने लिहले आहे. सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या आत्महत्येला जबाबदार कोण? मुख्यमंत्री, परिवहनमंत्री ?'
'फक्त कोरोना योद्धा म्हणून या कर्मचाऱ्यांचा गौरव करुन काय फायदा ? त्याने यांच्या घराची चूल चालणार आहे का ?. डेपो तारण ठेवणे विकणे हा पर्याय नाही. कायम स्वरूपी तोडगा काढला पाहिजे. ठाकरे सरकारकडून लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या फोल ठरल्या आहेत. वीज बिलासंदर्भात दिवाळीच्या आधी आनंदाची बातमी देणार होते त्याचं काय झालं?' असा प्रश्न देखील नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.