मुंबई : पक्षातील बंडखोरी मोडून काढण्यासाठी भाजपाने चंग बांधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सध्या मुंबईचे तळ ठोकून आहेत, बंडखोरी करणाऱ्या किंवा संबंधितांना संपर्क करण्याचे मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. समजून घालत, आश्वासने देत किंवा मग पक्ष कारवाईचा धाक दाखवत बंडखोरांना शांत करण्याचे काम सुरू आहे.
साधारण २५ पेक्षा जास्त जागांवर बंडखोरी झालेली आहे, याचा फटका काही ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला तर काही ठिकाणी शिवसेनेला बसू शकतो. तर काही ठिकाणी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला बंडखोरांनी पाठिंबा दिला असल्याने भाजपाची गोटात चिंतेचे वातावरण आहे.
उद्या (सोमवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांना शांत करण्याचे काम 'हॉटलाईन' मार्फत संपर्क करत सुरू आहे.