मुंबई : आपल्या कार्यकर्त्यांवर नेहमी अन्याय प्रदेश कमिटीकडून करण्यात येत आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केलाय. सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी बरखास्त केल्यानंतर नारायण राणे अधिकच आक्रमक केले. त्यांनी काँग्रेस नेत्यांवर तोंडसुख घेतले. आता तर माजी खासदार नीलेश राणे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नेत्तृत्व आम्ही मानत नाही, असे विधान केलेय.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नेत्तृत्व आम्ही मानत नाही. त्यामुळे त्यांचा आदेश मानायचा प्रश्नच उद्भवत नाही, असा हल्लाबोल नीलेश राणे यांनी चव्हाणांवर केला. आम्ही आजही काँग्रेसमध्ये आहोत. अशोक चव्हाण यांचे नेत्तृत्व आम्ही मानत नाही. त्यांचा आदेश मानायचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे ते म्हणालेत.
आम्ही केवळ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नेत्तृत्व मानतो. त्यामुळे सोनिया गांधी आणि नारायण राणे यांचेच निर्णय आम्ही मानतो, अशा शब्दात नीलेश राणे यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, हुसेन दलवाई त्यांचा खासदार निधी टक्केवारीत वाटत असल्याचा गंभीर आरोपही नीलेश राणेंनी दलवाई यावेळी केला.