जेलमधून बाहेर आल्यावर आर्यन खान सर्वात पहिलं करणार 'हे' काम, समीर वानखेडेंना दिलं वचन

समीर वानखेडेंना आर्यन खानकडून मोठं वचन

Updated: Oct 17, 2021, 07:12 AM IST
जेलमधून बाहेर आल्यावर आर्यन खान सर्वात पहिलं करणार 'हे' काम, समीर वानखेडेंना दिलं वचन  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (ShahRukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अजूनही ड्रग्स प्रकरणात आर्थर रोड कारागृहात आहे. या दरम्यान नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अधिकाऱ्यांनी (NCB) समुपदेशन केले. या दरम्यान आर्यन खानने NCB अधिकारी, समीर वानखेडेंना वचन दिलं आहे. 

आर्यन खानचं समीर वानखेडेंना वचन 

आर्यन खानने NCB अधिकाऱ्यांना दिलेल्या वचनात म्हटलं की, तो जेलमधून बाहेर आल्यावर पहिलं काम समाजसेवेचं करणार आहे. गरीबांच्या कल्याणासाठी तो काम करणार आहे. भविष्यात कोणतंच चुकीचं काम करणार नाही. ज्यामुळे त्याचं नाव खराब होईल. 

एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समुपदेशनादरम्यान आर्यन म्हणाला की, त्याच्या सुटकेनंतर तो गरीब आणि गरजू लोकांच्या भल्यासाठी काम करेल. तसेच, तो कधीही असे काही करणार नाही ज्यामुळे त्याचे नाव खराब होईल. आर्यन म्हणाला, 'मी असे काहीतरी करेन ज्यामुळे तुम्हाला माझा अभिमान वाटेल.'

आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये कैद 

23 वर्षीय आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. ड्रग्ज प्रकरणात त्याला एनसीबीने अटक केली होती. आर्यन व्यतिरिक्त, एनसीबीने इतर 7 आरोपींनाही अटक केली, त्यापैकी 2 त्याचे जुने मित्र आहेत. या सर्वांना तुरुंगात पाठवण्यापूर्वी एनसीबीने त्यांचे समुपदेशनही केले होते. आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

घरातलं जेवण जेवणार नाही आऱ्यन 

सध्या आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये कैदी क्रमांक एन 956 आहे. आर्यन खान आणि इतर कैद्यांना बॅरक क्रमांक 1 च्या क्वारंटाईन बॅरेकमधून काढून सामान्य कैद्यांमध्ये हलवण्यात आले आहे. प्रत्येकाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच जेल प्रशासनाने हा निर्णय घेतला. म्हणजेच आता आर्यनला बाहेरचे किंवा घरचे अन्न खाण्याची परवानगी मिळणार नाही. मात्र, तरीही त्यांना घरून पाठवलेले कपडे वापरता येतील.