अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन

आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका यांना पुत्ररत्न

Updated: Dec 10, 2020, 05:10 PM IST
अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन title=

मुंबई : भारतील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नीता आणि मुकेश अंबानी आजी-आजोबा झाले आहेत. नीता आणि मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका यांनी गोड बातमी दिली. आकाश आणि श्लोकाला गुरूवारी मुलगा झाला आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचे वातावरण  आहे. अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे. 

महत्त्वाचं म्हणजे अंबानी कुटुंबातील नवा पाहुणा आणि श्लोकाची दोघांची प्रकृती उत्तम असल्याचं देखील प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं आहे. ' भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने आणि आशीर्वादाने श्लोका आणि आकाश अंबानी आज आई-बाबा बनले आहेत.' अशी अधिकृत घोषणा अंबानी कुटुंबाकडून करण्यात आली. 

श्लोका आणि आकाश शाळेपासूनच एकमेकांच चांगले मित्र आहेत. कलांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अखेर आकाश अंबानी आणि श्लोका २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. आता त्यांचं नातं एका वेगळ्या वळणावर येवून पोहोचलं आहे. 

मोठ्या थाटात हा विवाह पार पडाला. आजही या विवाहाची जगभरात चर्चा आहे. सोशल मीडियावरही कित्येक दिवस त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा सुरु होती. त्यांच्या या शाही विवाहाला अनेक कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.