अणु ' शक्ती' प्रकटली: पोखरण -२ बाबत कुतुहल प्रेक्षकांचे उत्तरे डॉ. अनिल काकोडकरांची

पोखरण -२ ला २० वर्षे पुर्ण होत असतांना पोखरण अणु चाचण्यांबद्दल, त्यानंतर भारताने केलेल्या अणु संशोधन आणि अणु ऊर्जा क्षेत्रातील वाटचालीबद्दल डॉ अनिल काकोडकर काय भाष्य करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated: May 7, 2018, 08:50 AM IST

मुंबई: स्वात्तंत्र्यानंतर देशातील एक महत्त्वाची घटना म्हणून ओळखल्या जाणा-या पोखरण - २ ला येत्या ११ मे रोजी २० वर्षे पुर्ण होत आहेत. ११ मे १९९८ ला भारताने पोखरण इथे ३ यशस्वी अणु चाचण्या घेत जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर दोन दिवसांनी १३ मे ला पुन्हा दोन अणु चाचण्य़ा घेण्यात आल्या. या यशस्वी चाचण्यांच्या घटनाक्रमात प्रत्यक्ष सहभाग, महत्त्वाची भुमिका बजावणा-या डॉ अनिल काकोडकर यांच्या पोखरण -२ बाबतचा अनुभव कथन करणारा कार्यक्रम झी २४ तासने आयोजित केला आहे. आज  - अणु ' शक्ती'  प्रकटली , हा कार्यक्रम विलेपार्ले पुर्व इथे संध्य़ाकाळी ६ वाजता पीटीवीए इन्स्टिट्युट ऑफ मेनेजमेंट  च्या केशवराव घैसास सभागृह इथे होत आहे. या निमित्ताने पोखरण -२ बद्दल प्रश्न विचारायची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे.