मुबई : खडसें विरोधात मी जो गुन्हा दाखल केला होता तो बंद झाल्याचे खडसे सांगतायत ते खोट आहे. त्यांच्या विरोधातील गुन्हा अजूनही सुरु असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजल दमानिया यांनी म्हटलंय. खडसेंविरोधात मी जे काही आरोप केले त्यासाठी मला जळगावचे गजानन आणि जळगावचेच चंद्रकांत पाटील यांनी मदत केली देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांना सोयीस्कर राजकारण करायचं होतं. त्या एफआयआरपुढे काहीही कारवाई झाली नसल्याचेही अंजली दमानिया यांनी म्हटलंय.
बाई गोंधळ करत होती म्हणून एफआयर दाखल झाली असे फडणवीस म्हणाल्याच विधान खडसेंनी केले होते. यावर देखील दालमिया यांनी भाष्य केलंय. मी गोंधळ करत होती ? आज जर असं काही घडलं तर अमृता फडणवीस यांच्याबाबत फडणवीस असे बोलतील का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
खडसेंनी ३ सप्टेंबर २०१७ सभेत माझ्याबाबत अश्लील भाषा वापरली. एवढ्या खालच्या दर्जाचं ते बोलले त्याबाबत मी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. सभेत ते जे बोलले एवढं असभ्य बोलले. शिवाजी महाराजांच्या राज्यातील या नेत्यांना त्यांची जराही सर नाही. हा गुन्हा जळगावमध्ये हलवण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
काल खडसे जे बोलले ते संपूर्णपणे खोट बोलले. आम्ही राजकारण करत नाही. ते माझं नाव वारंवार घेत आहेत. परत नाव घेतलं तर याद राखा.. मी लढा देईल आणि न्यायालयीन लढा देईन असं दालमिया यांनी सांगितले. मी माझा लढा खडसे, पवार, भुजबळ यांच्या विरोधात केला पण मला खडसेंनी मला त्रास दिला. पण खडसेंनी माझा छळ केला. ६ जिल्ह्यात गुन्हे दाखल केल्याचेही त्या म्हणाल्या.