Anil deshmukh resigned | अनिल देशमुख यांचा राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा

अनिल देशमुख यांनी अखेर राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.  अनिल देशमुख यांनी आपला गृहमंत्रीपदाचा राजीनामा

Updated: Apr 5, 2021, 03:13 PM IST
Anil deshmukh resigned | अनिल देशमुख यांचा राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा title=

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई :अनिल देशमुख यांनी अखेर राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.  अनिल देशमुख यांनी आपला गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देत आहेत. यासाठी अनिल देशमुख हे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्यासाठी रवाना झाले आहेत. सीबीआय चौकशी दरम्यान पदावर राहणं योग्य नसल्याने त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असल्याचं अल्प संख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर केल्यानंतर, हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीतील हा दुसऱ्या मंत्र्यांचा राजीनामा आहे, यापूर्वी संजय राठोड यांना पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख (HomeMinister Anil Deshmukh) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने (CBI) १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) दिले आहेत.हे अभूतपूर्व प्रकरण आहे. खुद्द माजी मुंबई पोलिस आयुक्तांनीच (Mumbai Police commissioner) गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याने आम्ही प्राथमिक चौकशीचा आदेश देत आहोत असे मुंबई हायकोर्टने म्हटलंय.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण अनिल देशमुख यांच्याविरूद्ध सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंग यांनी केलेले सर्व आरोप गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.