मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या (Andheri By Election) एकमेव जागेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले विघ्न अजूनही क्षमण्याचे नाव काही घेत नाहीये. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार ऋुतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या राजीनाम्यापासून ते चिन्हापर्यंत अनेक वाद झाले. त्यानंतर अखेर ऋतुजा लटके आणि भाजप-महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. आता यानंतर ठाकरे गटाकडून मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर घेतलेला आक्षेप निवडणूक आयोगाने (Central Election Comission) फेटाळला आहे. त्यामुळे आता ठाकरे गट पटेल यांच्याविरोधात उच्च न्यायालयात (Bombay High Court) जाणार आहे. (andheri by election uddhav thackeray group may be go high court against to murji patel candidature sandeep naik)
या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा 14 ऑक्टोबर शेवटचा दिवस होता. त्यानंतर निवडणूक आयोगाची आजपासून म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून अर्ज छाननी प्रक्रिया सुरु झाली आहे. यानुसार ठाकरे गटाचे डमी उमेदवार आणि माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी आक्षेप घेतला. मात्र आता निवडणूक आयागाने हा आक्षेप फेटाळला आहे. त्यामुळे संदीप नाईक पर्यायाने ठाकरे गट हे मुरजी पटेल यांच्या उमेदवारीविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवाराला आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि इतर वैयक्तिक माहिती द्यावी लागते. मात्र मुरजी पटेल यांनी आपल्यावर असलेले गुन्हे लपवल्याचा आरोप संदीप नाईक यांनी केला. तर याआधी 2017 च्या बीएमसी निवडणुकीतही मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल या 2 वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले होते. मात्र त्यानंतर संदीप नाईक यांनी श्री आणि सौ पटेल यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पटेल दाम्पत्यांचं नगरसेवक काढून टाकण्यात आलं होतं.
त्यानंतर आता नाईकांनी घेतलेला आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळलाय. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या भूमिककडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.