परदेशी पाहुण्यासाठी प्राइवेट जेट, अनंत-राधिकाच्या वेडिंगची गेस्ट लिस्ट पाहिली का?

 रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. या विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून ते राजकीय बड्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. 

Updated: Jul 10, 2024, 06:46 PM IST
परदेशी पाहुण्यासाठी प्राइवेट जेट, अनंत-राधिकाच्या वेडिंगची गेस्ट लिस्ट पाहिली का?  title=

Anant-Radhika Wedding Guest List :  रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अँटिलियामध्ये लग्नाचे सर्व कार्यक्रम सुरु झाले असून लग्नाची गेस्ट लिस्ट समोर आली आहे. 

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, मुकेश अंबानी यांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांची यादी समोर आलीय. अंबानी कुटुंबीयांच्या या कार्यक्रमाला बॉलिवूडपासून राजकीय जगतातील बड्या नेत्यांचा आणि व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय विदेशातून अंबानी यांचे खास पाहुणे देखील या लग्नात सहभागी होणार आहेत. 

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जाणार! 

12 जुलै रोजी होणाऱ्या अनंत-राधिका यांच्या लग्नसोहळ्याला केवळ बॉलिवूड स्टारच नाही तर राजकीय बड्या नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त ठाकरे कुटुंबीय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सर्व पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांना  अनंत-राधिका यांच्या लग्नसोहळ्यासाठी निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. 

मुकेश अंबानी यांच्या गेस्ट लिस्टमध्ये बॉलिवूड, बिझनेस सेक्टर, स्पोर्ट्स, पॉलिटिकल सेक्टरसह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा समावेश आहे. अंबानी यांच्या परदेशी पाहुण्यांमध्ये क्रीडा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि त्यांची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कॅनेडियन रॅपर आणि गायक ड्रेक, अमेरिकन गायिका लाना डेल रे आणि मॉडेल अनंत-राधिकाचा लग्नासाठी मुंबईला पोहोचू शकतात.

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन रिअ‍ॅलिटी स्टार किम कार्दशियनचे मेकअप आर्टिस्ट, मारियो डेडिव्हानोविक, यूएस टिकटोकर आणि कंटेंट क्रिएटर ज्युलिया चाफे आणि हेअर स्टायलिस्ट क्रिस अॅपलटन यांनाही अनंत-राधिका यांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यात आलं आहे. 

बॉलिवूडमधील कोणाला आमंत्रण? 

मीडिया रिपोर्टनुसार, अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याच्या गेस्ट लिस्टमध्ये बॉलिवूड कलाकार देखील मोठ्या प्रमाणात असणार आहेत. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कियारा अडवाणी, शाहिद कपूर, विकी कौशल, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्याला येणार आहेत.