'माझा दिवस खास केला..' भाजी विक्रेत्या महिलेच्या CA झालेल्या मुलाचं आनंद्र महिंद्रांकडून कौतुक

डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा CA झाल्याच्या बातम्या आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आनंद महिंद्रा यांनी योगेशेचं खास कौतुक करुन ट्विट केलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 16, 2024, 08:19 PM IST
'माझा दिवस खास केला..' भाजी विक्रेत्या महिलेच्या CA झालेल्या मुलाचं आनंद्र महिंद्रांकडून कौतुक title=
Anand Mahindra shared special post on Do,bivali Vegetable vendor Women son Yogesh Thombare passes CA exam

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात. सकारात्मक गोष्टींवर ते व्यक्त होत असतात. आनंद महिंद्रा यांनी डोंबिवलीतील भाजी विक्रेत्याचा मुलगा योगेश ठोंबरे चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरचा खास आनंद व्यक्त केलेल्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया नोंदवील आहे. 

47 सेकंदाचा व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, आनंद महिंद्रा म्हणाले की, "याने माझा दिवस बनवला..."  मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठाण्यातील डोंबिवली (पूर्व) येथील भाजी विक्रेत्या मावशीचा मुलगा योगेश ठोंबरे आहे. योगेश सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो त्याच्या आईसोबत आनंदाची बातमी शेअर करताना दिसतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजीच्या स्टॉलवर आई-मुलाची ही खास भेट भावनिक आहे. ती त्याला मिठी मारते आणि त्याच्या कर्तृत्वाबद्दल ऐकून रडते.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे व्हिडिओ ऑनलाइन शेअर करणाऱ्या पहिल्या लोकांपैकी एक होते. “योगेश, तुझा अभिमान आहे,” त्याने व्हिडिओ शेअर करताना लिहिले. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश हा डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर येथील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणारा ठोंबरे मावशी यांचा मुलगा आहे. 

यामध्ये भाजी विक्रेत्या आईने आपल्या मुलाला प्रचंड मेहनत घेऊन शिकवलं आहे. आणि या परिश्रमाचं फळ अतिशय उत्तम मिळालं आहे.  “निश्चित, कठोर परिश्रम आणि कठोर परिश्रमाच्या बळावर योगशने खडतर परिस्थितीला तोंड देत हे शानदार यश मिळवले आहे. त्याच्या यशामुळे त्याच्या आईचे आनंदाश्रू लाखमोलाचे आहेत.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

महिंद्रा अँड महिंद्राच्या अध्यक्षांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर करताच, नेटिझन्सनी त्यांच्या प्रतिक्रिया पोस्ट केल्या.“त्याला कामावर घ्या. काही उदाहरण ठेवा सर!” एका युझरने लिहिले तर दुसऱ्याने कमेंट केली, “थार मार्गावर आहे.” एका युझरने आश्चर्य व्यक्त केले की, “बॉलिवूडने याविषयी चित्रपट बनवण्यासाठी किती वेळ घेईल, तर दुसऱ्याने टिप्पणी केली, “जेव्हा आशा सत्यात उतरते तेव्हा असे होते!”