मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी राज्यात 5368 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,11,987 इतकी झाली आहे. सध्या 87,681 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राज्यात आज एका दिवसांत 204 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 9026 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.26 टक्के इतका आहे.
राज्यात सोमवारी एका दिवसात 3522 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण 1,15,262 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.37 टक्क्यांवर पोहचलं आहे.
Maharashtra recorded 5,368 new COVID-19 cases and 204 deaths in the last 24 hours, taking total number of cases to 2,11,987 and death toll to 9,026: Number of active cases stands at 87,681. Recovery rate among the patients is 54.37%: State Health Department pic.twitter.com/jojIS5cEsG
— ANI (@ANI) July 6, 2020
आज मुंबईत 1200 नव्या कोरोनाबिधात रुग्णांची वाढ झाली आहे. एकट्या मुंबईत सर्वाधिक 85724 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 4938 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत 57152 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईत 23624 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.