बीएमसीच्या या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांचा विरोध

मुंबईतील सोसायट्यांमधील कचरा 2 ऑक्टोबरपासून मुंबई महापालिका उचलणार नाही

Updated: Sep 18, 2017, 10:59 PM IST
बीएमसीच्या या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांचा विरोध title=

मुंबई : मुंबईतील सोसायट्यांमधील कचरा 2 ऑक्टोबरपासून मुंबई महापालिका उचलणार नाही, या प्रसासनाच्या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांनी विरोध दर्शवलाय. 

नगरसेवकांना विश्वासात न घेता निर्णय कसा काय घेतला ? याबरोबरच प्रशासन कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना महापौरांचं मत विचारात का घेतं नाही, असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित करताहेत.

 सोसायट्यांमधील कचरा न उचलल्यास तोच कचरा प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये नेऊन टाकला जाईल असा इशारा भाजप गटनेते मनोज कोटक यांनी दिलाय.