परमबीर सिंह लेटर आणि फोन टॅपिंगप्रकरणी अजित पवारांची पहिलीच प्रतिक्रिया...

राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंग प्रकरणी संताप व्यक्त केला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच या सर्व प्रकरणांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Mar 25, 2021, 01:26 PM IST
परमबीर सिंह लेटर आणि फोन टॅपिंगप्रकरणी अजित पवारांची पहिलीच प्रतिक्रिया... title=

मुंबई : परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगच्या दिलेल्या अहवालामुळे सरकारसमोर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात येत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंग प्रकरणी संताप व्यक्त केला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच या सर्व प्रकरणांवर प्रतिक्रिया दिली आहे.
 
वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्यात पोलीसांच्या बदलीचे रॅकेट चालू असल्याचा तसेच त्यात भ्रष्ट्राचार होत असल्याचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला होता. 

परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर ठाकरे सरकारवर पुन्हा टीकेचे सूर उमटले. 

बुधवारी झालेल्या मंत्रिमडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत सर्व मंत्र्यांशी चर्चा केली.

या सर्व प्रकरणांवर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

'राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व आरोपांबाबत गांभीर्यांने चर्चा  करण्यात आली आहे. ज्या कोणाची चूक असेल, सरकार त्याला पाठीशी घालणार नाही. जी वस्तुस्थिती आहे ती लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल'

रश्मी शुक्ला य़ांनी केलेले फोन टॅपिंग तत्कालिन अतिरिक्त गृहसचिव सिताराम कुंटे यांच्या परवानगीने केली होती. त्यामुळे कुंटे यांच्याकडून संबधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागितला आहे.' असे अजित पवार यांनी म्हटले आहे.