बोगस डिग्रीवरुन अजित पवारांची विनोद तावडेंवर टीका

बोगस डीग्री असणा-या व्यक्तिकडे शिक्षण खात्याचा कारभार असून शिक्षणाचा बाजार मांडला आहे अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी विनोद तावडे यांचं नाव न घेता टीका केली आहे.

Updated: Sep 18, 2017, 03:40 PM IST
बोगस डिग्रीवरुन अजित पवारांची विनोद तावडेंवर टीका title=

मुंबई : बोगस डीग्री असणा-या व्यक्तिकडे शिक्षण खात्याचा कारभार असून शिक्षणाचा बाजार मांडला आहे अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी विनोद तावडे यांचं नाव न घेता टीका केली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळामार्फत आयोजित बाबुरावजी घोलप पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते.

मुंबई विद्यापीठाचे निकाल अजून लागले नाहीत यासाठी कुलगुरुंना जबाबदार धरलं जातय, मात्र याबाबत सरकारची काही जबाबदारी आहे की नाही असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. याखेरीज भाजपमध्ये सद्या प्रश्न विचारायची सोय नसल्याचं म्हणत त्यांनी भाजपवरही तोंडसुख घेतलं.

आपण जातीच्या भिंती बाजूला सारल्या पाहिजेत असही त्यांनी पुण्यात सोवळ्यावरुन गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर मत व्यक्त केलं. याशिवाय एक दिवस किक मारुन महाराष्ट्र फुटबॉलमय होत नसल्याची टीकाही त्यांनी केली.