मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी होऊपर्यंत त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण अनिल देशमुख यांच्याविरूद्ध सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंग यांनी केलेले सर्व आरोप गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आता गृहखात्याची जबाबदारी देखील असणार आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राज्याचे गृहमंत्री म्हणून देखील काम पाहणार आहेत.
जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यात त्यांनी परमबीर सिंग यांच्याकडून अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपावर सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
सीबीआयने आपला प्राथमिक तपास अहवाल पंधरा दिवसांत उच्च न्यायालयात सादर करावा, असे हायकोर्टाने म्हटले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खूप गंभीर आहेत, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की, अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि यामुळे इज प्रकरणाची चौकशी निःपक्षपाती असावी. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.
परंबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात असा दावा केला आहे की, देशमुख यांनी सचिन वाजे यांना बार आणि रेस्टॉरंटमधून 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते.