Satyajeet Tambe : डॉ.सुधीर तांबे यांच्यानंतर सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई

Satyajeet Tambe Suspended: काँग्रेसचे निलंबित ज्येष्ठ नेते डॉ. सुधीर तांबे  (Sudhir Tambe)  यांच्यानंतर त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे  (Satyajeet Tambe) यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून (Congress) तांबे पिता-पुत्रावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

Updated: Jan 19, 2023, 03:18 PM IST
Satyajeet Tambe : डॉ.सुधीर तांबे यांच्यानंतर सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई title=

Maharashtra Politics: नाशिक पदवीधर मतदार संघाच्या ( Nashik Graduate Constituency Election ) निवडणुकीवरुन सुरु झालेल्या वादात दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. ज्येष्ठ नेते डॉ. सुधीर तांबे  (Sudhir Tambe)  यांना नुकतेच काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं होतं. आता सुधीर तांबे यांचे सुपूत्र सत्यजित तांबे  (Satyajeet Tambe) यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सत्यजित तांबे यांची देखील काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसकडून तांबे-पिता पुत्रावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे (Maharashtra Politics).
 
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला (Maharashtra Political News). सत्यजित तांबे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील रंगली आणि नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

डॉ. सुधीर तांबें यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्याने ही कारवाई करण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील त्यांच्या निलंबनाचे पत्रक काँग्रेसने जाहीर केले आहे. राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

डॉ. सुधीर तांबें यांच्यानंतर आता त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डॉ. सुधीर तांबें यांच्यावर कारवाई केल्यानंतर काँग्रेस पक्षाने सत्यजित तांबे यांच्यावर देखील कारवाई करण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांच्यावर निलबंनाची कारवाई करण्यात आल्याची घोषणा केली. 

उमेदवारीवरुन झाला वाद

काँग्रेस पक्षानं डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, त्यांनी अर्ज भरलाच नाही. त्यांच्याऐवजी सुपुत्र सत्यजित तांबे अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून उभे राहिले. सत्यजित तांबेंना उमेदवार केल्यानं थोरात विरुद्ध तांबे असा मामा-भाच्यांचा गृहकलह सुरू झाला आहे. 

भाजपची जबरदस्त खेळी

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अखेर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे आज राबवण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, हे समोर आलंय. त्यामुळे या खेळीमागे भाजपची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा सध्या नगर जिल्ह्यात रंगली आहे.