मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) कोविड योद्धा पत्रकारांचा (Covid Warrior) विशेष सन्मान केला. कोरोना काळातही अवितर काम करत राज्यातल्या जनतेपर्यंत प्रत्येक बातमी पोहोचवल्याबद्दल पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यात झी 24 तासचे पत्रकार दीपक भातुसे (Deepak Bhatuse) आणि कृष्णात पाटील (Krishnat Patil) यांनाही त्यांच्या कार्यासाठी गौरवण्यात आलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झी 24 तासचे वरीष्ठ पत्रकार दीपक भातुसे आणि कृष्णात पाटील यांना सन्मान चिन्ह दोऊन त्यांचा सन्मान केला. राज्यातल्या अनेक पत्रकारांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून पत्रकारिता केली आहे. आणि कोरोनाच्या अपडेटसह प्रत्येक बातमी जनतेपर्यंत पोहोचवली. त्यामुळंच पत्रकारांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कोरोनाच्या काळात संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. यावेळी फक्त पत्रकार रस्त्यावर उतरून कोरोनाची आणि दिवसभरात घडणाऱ्या घडामोडींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवत होते. कोरोनामुळे सगळंच बंद होतं अशावेळी पत्रकारांना काम करत असताना अनेक समस्या आल्या. अनेकदा काम करत असताना खायला देखील काही मिळत नव्हतं. अशावेळी आपली काळजी घेत नागरिकांपर्यंत बातमी पोहोचवण्याचे काम आमचे पत्रकार मित्र करत होते.
बातमी देत असताना कोरोनाच्या काळातील सगळे नियम काटेकोरपणे पाळले जात होते. मात्र कोरोनाची भीती ही कायमच होती. पण या पत्रकार मित्रांनी आपली भूमिका जोख बजावली. त्यांच्या कार्याला सलाम....