Mukesh Ambani Grandson : बाळाचं नाव ठेवलं 'पृथ्वी'; काय आहे या मागचं कारणं?

देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबात जन्मलं बाळ 

Updated: Dec 25, 2020, 07:47 AM IST
Mukesh Ambani Grandson : बाळाचं नाव ठेवलं 'पृथ्वी'; काय आहे या मागचं कारणं?  title=

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपत मुकेश अंबानी(Mukesh Ambani Grandfather) हे नुकतेच आजोबा झाले आहेत. १० डिसेंबर रोजी आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका अंबानी (Shloka Ambani) यांना मुलगा झाला आहे. ज्युनिअर अंबानी येताच संपूर्ण अंबानी कुटुंबियात आनंदाच वातावरण पसरलं आहे. आकाश आणि श्लोका अंबानीच्या बाळाचं नामकरण झालं आहे. आणि आतापासूनच हे बाळ चर्चेत आलं आहे. या बाळाच्या नावाची अधिकृत घोषणा अंबानी कुटुंबियांनी केली आहे. 

आकाश आणि श्लोकाच्या मुलाचं नामकरण झालं आहे. देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबात जन्माला आलेल्या अंबानी यांच्या नातवाचं नाव आहे. 'पृथ्वी आकाश अंबानी' (Prithvi Akash Ambani). या नावा मागे एक गुपित लपलं आहे. 

काय आहे या नावा मागचा अर्थ 

मुकेश अंबानी यांच्या घरी जेव्हा पहिल्या मुलाचा जन्म झाला आणि ते वडिल झाले तेव्हा ते विमानात होते. त्यांना विमानात आपण बाप झाल्याची गोड बातमी मिळाली होती. त्यामुळे त्यांनी आकाश अंबानी (Akash Ambani) असं नाव ठेवलं. 

आता त्यांच्या नातवाच्या नावाचं कनेक्शन याच्याशी जोडत आहे. आजोबा मुकेश अंबानी यांना आपल्या नातवाची जन्माची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा ते जमिनीवर होते त्यामुळे त्याचं नाव 'पृथ्वी' ठेवण्यात आली. यामुळे त्यांनी आपल्या नातवाचं नाव Prithvi Akash Ambani असं ठेवलं आहे. 

पृथ्वीच्या जन्माची माहिती एका कार्ड द्वारे देण्यात आली. सुंदर कार्ड तयार करून त्यावर लिहिण्यात आलं की भगवान कृष्णाच्या कृपेने आणि धीरूभाई अंबानी- कोकिलाबेन अंबानी यांच्या आशिर्वादाने आकाश-श्लोका अंबानीला मुलगा झाला आहे. आकाश-श्लोका अंबानीच्या बाळाचं नाव 'पृथ्वी आकाश अंबानी' असं आहे. 

आकाश आणि श्लोकाचं मार्च २०१९ मध्ये लग्न झालं आहे. या लग्नाला अनेक दिग्गज मंडळी आणि कलाकार उपस्थित होते.