नारायण राणे यांच्या ट्विटनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, 'ऍक्शनला रिऍक्शन मिळणारंच'

शिवसेना - राणे संघर्ष आणखी तीव्र! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा स्फोटक ट्विट करत शिवसेनेला इशारा 

Updated: Feb 18, 2022, 07:21 PM IST
नारायण राणे यांच्या ट्विटनंतर चंद्रकांत पाटील म्हणतात, 'ऍक्शनला रिऍक्शन मिळणारंच' title=

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील अधीश बंगल्यावर मुंबई महापालिकेचं पथक पोहोचताच, राणेंनी स्फोटक ट्वीट केलं आहे. 'मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचा दावा राणे यांनी या ट्वीटमध्ये केला आहे. 

सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन या दोघांची हत्या झाली होती. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. याचीही चौकशी होणाराय, असा दावा राणेंनी केला आहे. यासंदर्भात उद्या मुंबईत आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचं राणेंनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं.  

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

यावर बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अॅक्शनला रिअॅक्शन मिळणारच अशी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे हे माहितीच्या आधारेच बोलतात, ते केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना सर्व माहित असले. सर्व सुडाचं राजकारण सुरु आहे. आणि अॅक्शन रिअॅक्शन सुरु आहे. त्यांना जे करायचं आहे ते त्यांनी करावं आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करु, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांचं स्फोटक ट्विट
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी स्फोटक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे शिवसेनेला (Shivsena) गंभीर इशारा दिला आहे. मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचं राणेंनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)यांना लवकरच खास बातमी मिळेल, असा इशारा नारायण राणे यांनी ट्विटद्वारे दिला आहे. 

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि अभिनेत्री दिशा सालियन या दोघांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. तसंच दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे",  असा गंभीर आरोपही राणेंनी या ट्विटमधून केला आहे. या दोघांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी केली जाणार असल्याचा इशाराही राणेंनी दिला. 

राणेंनी या ट्विटमधून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही प्रश्न विचारला आहे. "विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी आहे. मातोश्रीवर ईडीची नोटीस आल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार", असा सवाल राणेंनी या ट्विटमधून विनायक राऊतांना केला आहे.