Raj Thackarey : राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत आजच कारवाई... पोलीस महासंचालकांचा इशारा

अक्षय तृतीया आणि ईदच्या सर्व जनतेला शुभेच्छा आहेत. राज्यात सामाजिक सलोखा कायम ठेवावा. कायद्याची अंमलबजावणी करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे.

Updated: May 3, 2022, 01:55 PM IST
Raj Thackarey : राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत आजच कारवाई... पोलीस महासंचालकांचा इशारा title=

मुंबई : अक्षय तृतीया आणि ईदच्या सर्व जनतेला शुभेच्छा आहेत. राज्यात सामाजिक सलोखा कायम ठेवावा. कायद्याची अंमलबजावणी करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Sheth) यांनी दिला.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी आज सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न हाताळण्यास पोलीस दल सक्षम आहे.

समाजकंटक आणि गुन्हेगार स्वरूपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, राज्यात सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. जनतेने शांतता, सुव्यवस्था राखून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

कुणीही धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर आवश्यक आणि कडक कारवाई करू. काही लोकांना नोटीस पाठविल्या आहे. कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडविल्याचा कारवाई होणारच.

राज ठाकरे (Raj Thackarey) यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाचा अभ्यास औरंगाबाद पोलीस आयुक्त करत आहेत. राज ठाकरे यांच्या सभेबाबत जी काही कारवाई करायची आहे ती कारवाई करण्यास ते सक्षम आहेत. आजच ही कारवाई होईल असेही रजनीश सेठ यांनी सांगितले.