मुंबई : मुंबईच्या नायर रूग्णालयात एका दुर्देवी अपघातात रूग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रूग्णालयातील कर्मचाऱ्याने रूग्णाच्या नातेवाईकाला MRI रूममध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर आणायचा असल्याच सांगितलं,नातेवाईकानं विरोध केला,मात्र MRIमशिन बंद असल्यानं सिलेंडर आत नेण्यास हरकत नसल्याच वॉर्ड बॉयने सांगितल.
रूग्णाच्या नातेवाईकाने सिलेंडर आत नेला असता,सिलेंडर सकट ती व्यक्ती MRI मशीनमध्ये ओढली गेली आणि सिलेंडरचा व्हॉल्व लीक होऊन ऑक्सिजन बाहेर येऊ लागला...
राजेशचा हात MRI मशीनमध्ये अडकला. हे सगळ अनपेक्षित घडल्याने कोणीच काहीच करू शकलं नाही.अखेर वॉर्ड बॉयच्या मदतीने MRIमशीन बंद करून राजेशला बाहेर काढण्यात आल आणि ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आलं.
मात्र उपचारा दरम्यान राजेशचा मृत्यू झाला. यात दोषी असलेल्यांवर जोवर कारवाई होत नाही तोवर राजेशचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच राजेशच्या नातेवाईकांनी सांगितलयं.