टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनच्या किंमतीत वाढ

अनावश्यक गोष्टींच्या आयातीवर निर्बंध आणण्याचा निर्णय 

Updated: Sep 27, 2018, 10:41 PM IST
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनच्या किंमतीत वाढ title=

मुंबई: रुपयाच्या घसरणीला ब्रेक लागावा या उद्देशानं केंद्र सरकारने अनावश्यक आयातींवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार मध्यरात्रीपासून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यासारख्या घरगुती वापराच्या आयात होणाऱ्य़ा वस्तूवरील आयात शुल्क दुपट्टीने वाढवण्यात आले आहे. 

यापूर्वी परदेशातून येणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील आयत शुल्क १० टक्के होते. आता हे शुल्क वीस टक्के करण्यात आले. गेल्या काही दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली. त्यामुळे देशाच्या वित्तीय तूटीमध्ये कमालाची वाढ होत आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टींच्या आयातीवर निर्बंध आणण्याचा निर्णय पंतप्रधानांनी दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या वित्तमंत्रालयाच्या बड्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता.