वरातीत नाचता नाचता हॉस्पिटलमध्ये पोहचले; नवरदेवाच्या कारने 12 वऱ्हाड्यांना चिरडले

Ulhasnagar Accident: लग्नात नाचणाऱ्या वऱ्हाड्यांना नवरदेवाच्या कारने चिडल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडलीय. शांतीनगर परिसरात हा विचित्र अपघात घडला आहे.

वनिता कांबळे | Updated: May 9, 2023, 11:38 AM IST
वरातीत नाचता नाचता हॉस्पिटलमध्ये पोहचले; नवरदेवाच्या कारने 12 वऱ्हाड्यांना चिरडले title=

Ulhasnagar Accident: वरातीत नाचता नाचता वऱ्हाडी हॉस्पिटलमध्ये पोहचले आहेत. नवरदेवाच्या कारने 12 वऱ्हाड्यांना चिरडले आहे. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. लग्न समारंभात झालेल्या या विचित्र अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. हा अपघात नेमका कसा घडला याची पोलिस चौकशी करत आहेत. 

लग्नात नाचणाऱ्या वऱ्हाड्यांना नवरदेवाच्या कारने चिडल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडलीय. शांतीनगर परिसरात हा विचित्र अपघात घडला आहे. या दुर्घटनेत 12 वऱ्हाडी जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये बहुतांश महिला आहेत. ज्या कारने वऱ्हाड्यांना चिरडलं ती ऑटोमॅटिक कार होती. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे.

वाशिममध्ये ऑटो पलटी होऊन अपघात 

वाशिमच्या रिसोड लोणी मार्गावरील साखरा फाट्याजवळ ऑटो पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात 10 जण गंभीर जखमी झाले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी पोलीस वाहनातून रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिसोडकडे जात असताना ऑटोसमोर रानडुक्कर आल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

दिवे घाटात टँकर दरीत कोसळला

पुणे सासवड मार्गावर दिवे घाटामध्ये टँकर दरीत कोसळला. या दुर्घटनेत 2 जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर, काही जण गंभीर जखमी आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान घटनास्थळी मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात

अमरावती जिल्ह्यातील वलगाव चांदुर बाजार रस्त्यावर बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 30 ते 35 प्रवासी जखमी झालेत. जखमींना तातीडनं जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, काही रूग्णांवर चांदूर बाजार इथल्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात 3 ते 4 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर

मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे जवळ पळस इथं उभ्या असलेल्या जिपला इनोव्हा कार ने धडक दिली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला. रणजित काकडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. टायरचे पंक्चर काढण्यासाठी स्कॉर्पिओ उभी असताना हा अपघात झाला. अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.