राज्यावर पुन्हा कोरोनाचं संकट, मास्कसक्ती होणार?

कोरोनाचं (Corona New Varient) संकट टळलंय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढलीये.

Updated: May 29, 2022, 09:48 PM IST
राज्यावर पुन्हा कोरोनाचं संकट, मास्कसक्ती होणार? title=

मुंबई :  बातमी आहे राज्यावर घोंगावणाऱ्या कोरोना संकटाची. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडलाय. अनेकांनी लसीचे दोन डोसही घेतले आहे. मात्र धोका अद्याप टळलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 7 रूग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे. (7 patients with new variants of omicron ba4 and ba5 found in maharashtra There may a compulsion to wear a mask)

कोरोनाचं संकट टळलंय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढलीये. राज्यात ओमायक्रॉनचे नवे व्हेरियंट BA.4 आणि BA.5 चे 7 रूग्ण आढळून आले आहेत. हे सातही रूग्ण पुण्यात आढळले आहेत. 

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयानं सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार ही माहिती पुढे आली आहे. 

यातील चार रूग्ण हे 50 हून अधिक वयाचे आहेत तर एका 9 वर्षांच्या मुलालाही नव्या व्हेरियंटची लागण झालीय. यातील दोन रूग्णांनी दक्षिण आफ्रिका आणि बेल्जिअमध्ये प्रवास केला होता. तर तिघांनी केरळ आणि कर्नाटकात प्रवास केलाय. तर दोन रूग्णांनी प्रवास केलेला नाही.  नव्या व्हेरियंटमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय. 

एकीकडे कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असताना पुन्हा एकदा मास्क सक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात सध्या मास्क वापरणं ऐच्छिक आहे. मात्र कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर लोकांनी मास्कचा वापर करायला हवा असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलंय.

A.4 आणि BA.5 हे ओमायक्रॉने नवे व्हेरियंट अतिशय वेगानं पसरतायेत. त्यामुळे पुन्हा निर्बंध नको असतील तर प्रत्येकानं आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला हवी.