मुंबईत गेल्या २४ तासांत ५७ नवे कोरोना रुग्ण

मुंबईत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला आहे.

Updated: Apr 6, 2020, 07:39 PM IST
मुंबईत गेल्या २४ तासांत ५७ नवे कोरोना रुग्ण title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. राज्यासह मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबईत ५७ रुग्ण वाढले आहेत. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४९० इतकी झाली आहे. तर मुंबईत कोरोनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८०९वर पोहचला आहे. त्यापैकी एकट्या मुंबईतच ४९० रुग्ण आहेत. त्यापैकी आतापर्यंत ५९ रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची माहिती आहे. राज्यात एकूण ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

सतत वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या राज्याची चिंता वाढवत आहे. वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. वरळी कोळीवाड्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 21वर पोहचली आहे. तर संपूर्ण वरळीत जवळपास 40 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारवीमध्येही कोरोनाग्रस्त आढळल्याने मुंबईसाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरत आहे.

मुंबईत कोरोनाचे हॉटस्पॉट वाढत आहेत. मुंबईतील वरळी, मानखुर्द, वांद्रे , अंधेरी ही ठिकाणं हॉटस्पॉट ठरली आहेत. तर मुंबईत 191 कंटेन्मेंट झोन तयार झाले आहेत. ज्या परिसरात कोरोना रुग्ण आढळून येतो, ती ठिकाणं, तो संपूर्ण परिसर सील करण्यात येत आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे. सोमवारी कल्याण-डोंबिवलीमध्ये 6 नवे रुग्ण आढळले आहेत. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 34वर पोहचला आहे.