मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात 3427 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर एका दिवसांत 113 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शनिवारी 1550 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
आतापर्यंत राज्यात 49 हजार 346 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 51 हजार 379 जणांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 4 हजार 568 इतका झाला आहे.
आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 3830 जणांचा मृत्यू झाला आहे.
Maharastra reports 3,427 new cases of #COVID19 & 113 deaths, taking the total number of cases to 1,04,568 & death toll to 3830: State Health Department pic.twitter.com/eUjqXeMbXQ
— ANI (@ANI) June 13, 2020
मुंबईत देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या एकट्या मुंबईत आहे. मुंबईत 56 हजार 831 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 25 हजार 947 रुग्ण बरे झाले असून 2113 जण दगावले आहेत. सध्या मुंबईत 28 हजार 763 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
धारावीत शनिवारी एका दिवसांत 17 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. आज धारावीत एकही मृत्यू झाला नाही. धारावीतील एकूण कोरोना रुग्णसंख्या 2030 वर गेली आहे. आज दादरमध्ये 19 तर माहिममध्ये 13 नवे कोरोनाग्रस्त वाढले आहेत. दादरमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 505 झाली असून माहिममध्ये 743 रुग्ण संख्या झाली आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही काहीसं सुधारत आहे. सध्या राज्यातील रिकव्हरी रेट 47.2 टक्के इतका आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.7 टक्के इतका आहे.