Mumbai Corona : मुंबईत कोरोनाचा कहर...आजपर्यंतची सर्वाधिक नव्या रुग्णांची वाढ

कोरोना मुंबईची पाठ सोडायला तयार नाहीये. मुंबईत आतापर्यंतची सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. आज (19 मार्च) मुंबईमध्ये 3 हजार 62 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 10 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 

Updated: Mar 19, 2021, 08:04 PM IST
Mumbai Corona : मुंबईत कोरोनाचा कहर...आजपर्यंतची सर्वाधिक नव्या रुग्णांची वाढ title=

मुंबई : कोरोना मुंबईची पाठ सोडायला तयार नाहीये. मुंबईत आतापर्यंतची सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. आज (19 मार्च) मुंबईमध्ये 3 हजार 62 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 10 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 

मुंबई जिल्ह्यातील कोरोनातून बरे होण्याचा दरही 91 टक्क्यांवर घसरला आहे. तर रुग्ण दुपट्टीचं प्रमाण जे कधी काळी 300-350 दिवसांवर पोहोचलेलं ते ही आता 124 दिवसांवर घसरले आहे. मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 55 हजार 897 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 11 हजार 565 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता मुंबई महापालिकाही अलर्ट झाली आहे. मुंबईत दररोज 1 लाख नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट असल्याचं महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं आहे. तसंच प्रत्येक खाजगी रुग्णालयानेही दिवासाला 1 हजार जणांचं लसीकरण पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवावं असे निर्देशही देण्यात आले आहेत. 

मुंबई आयुक्त इक्बाल चहल काय म्हणाले?

1. मुंबईत लसीकरणासाठी निर्देशित खाजगी रुग्‍णालयांची संख्‍या ५९ वरुन ८० पर्यंत नेण्‍यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

2. दररोज १ लाख याप्रमाणे ४५ दिवसांमध्‍ये ४५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्‍याचे उद्द‍िष्‍ट  

3. स्‍थानिक नगरसेवकांसह सामाजिक, सेवाभावी संस्‍थांच्‍या मदतीने लसीकरणाचा वेग वाढवणार 

4. सर्व शासकीय तसेच खाजगी रुग्‍णालयांना कोविड-१९ उपचारांसाठी येत्‍या ४८ तासामध्ये पूर्वीप्रमाणे रुग्‍णशय्या म्हणजेच बेड्स वाढविण्‍याच्या सूचना 

5. खासगी रुग्‍णालयांनी शासकीय दरपत्रकाप्रमाणे बिल आकारावे, निरीक्षणासाठी महानगरपालिकेच्‍या लेखापरीक्षकांची पुन्‍हा नियुक्‍ती करणार  

6. मुंबईतील दैनंदिन कोरोना चाचण्‍यांची संख्‍या २५ हजारांवरुन टप्प्याटप्प्याने ५० हजारांवर नेण्‍याचे लक्ष्‍य