मुंबई : तुम्ही म्हाडाच्या घरात राहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. म्हाडाच्या इमारतींना यापुढे मालकी हक्क मिळणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे नेमके काय परिणाम होणार, ते पाहूयात
हजारो जुन्या म्हाडा इमारतींचा पुनर्विकास रखडला असताना, आता गृहनिर्माण विभागाने नवा निर्णय घेतलाय. त्यानुसार म्हाडाच्या इमारतींना यापुढे मालकी हक्क दिला जाणार नाही. याचाच अर्थ तुम्ही म्हाडाच्या घरात राहत असला आणि ते घर तुमच्या मालकीचे असले तरी ती जमीन मात्र म्हाडाच्याच मालकीची असणार आहे.
एवढेच नव्हे तर यापुढे म्हाडा इमारतीचा पुनर्विकास करताना सोसायटी, बिल्डर आणि म्हाडा असा त्रिपक्षीय करारनामा करणे गृहनिर्माण विभागाने बंधनकारक केलं आहे.
म्हाडाच्या सहभागामुळे खरंच म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळेल की, पुनर्विकास आणखी खोळंबेल, हे येणारा काळच ठरवेल.