मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेची 3 कटकारस्थान - आशिष शेलारांचा आरोप

भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.

Updated: Jun 1, 2021, 05:00 PM IST
मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेची 3 कटकारस्थान - आशिष शेलारांचा आरोप title=

मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, गेले काही दिवस बघितलं तर शिवसेनेची खलबते, कटकारस्थाने सुरू आहेत, आमचं पूर्ण लक्ष आहे, पराभवाच्या भीतीने या सर्व पळवाटा सेनेच्या सुरू आहेत. कोरोनाची पहिली लाट ओसरत आहे हे लक्षात आल्यावर मे महिन्यात मुदतपूर्व मुंबई पालिका निवडणुका घ्यायच्या असं ठरलं, मात्र दुपारी लाट आल्याने हे शक्य झालं नाही. निवडणूक आधी का तर पावसाळ्यात तुंबलेले रस्ते दाखवायला नको म्हणून.'

'दुसरं कटकारस्थान म्हणजे तीन एक महिन्यांपूर्वी भाजप राज्य सरकारने जी प्रभाग रचना केली ती योग्य नसल्याचं म्हटलं. प्रभाग पुनर्रर्रचना करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही प्रभाग रचना 2011 ही जनगणनावर आधारित असल्याचं लक्षात आल्यावर हे थांबलं.'

'तिसरं कट कारस्थान 2021च्या जनगणेवर नवी प्रभाग रचना करता येईल अशी कल्पना पुढे आली. तेव्हा मुंबई पालिका निवडणुका दोन वर्षे पुढे ढकलण्याचा प्रयत्न शिवसेनेचा सुरू आहे याला आम्ही आव्हान देऊच.'

तिसरं कटकारस्थान, तीन वॉर्ड टार्गेट करून फोडायचे. जे 30 वॉर्ड आजन्म शिवसेना -काँग्रेसला जिंकताच येणार नाही असा प्रयत्न करणार आहेत. सुपारी घेतली आहे. 

या सर्व कटकारस्थानचा मुंबईकरानं फटका बसणार आहे. प्रभाग रचनेबाबत, निवडणुका पुढे ढकलण्याबाबत काँग्रेस - राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी. 

'70 कोटी खर्च करण्यात आलेली मुंबईतील नालेसफाई पूर्ण आभासी आहे, 70 कोटी पाण्यात जाणार हे दुर्देवी चित्र मुंबईकरांसमोर येणार आहे. 5 लाख मेट्रिक टन गाळ काढला आहे तर तो कुठे टाकला आहे, कुठल्या वजन काट्यावर मोजला ते जाहीर करा.' असं ही त्यांनी म्हटलं.

'महाविकास आघाडी सरकार हे कर्तृत्वामध्ये परावलंबी आहे. 10 टक्के आरक्षण दिलं यात ठाकरे सरकारचे कर्तृत्व काय ? ते तर पंतप्रधान यांनी दिलं होतं.'

'जे आरक्षण गायकवाड आयोगानंतर सामाजिक आणि आर्थिक आरक्षण जे मराठा समाजाला मिळालं ते मिळेपर्यंत भाजपचा लढा सुरू राहील. या विषयावर मोर्चे काढणारी हीच लोकं होती, मग आता सत्तेत का बसले आहात?'

'डायरीबरोबर डायनिंग सेटची मागणी केली होती असं समजत आहे, मुख्यमंत्री यांनी या घोटाळ्याची चौकशी केली पाहिजे. मुंबई ही वरळीतल्या फक्त भागापूरतीच आरक्षित राहिली आहे का ? दहिसरपर्यंत पण मुंबई आहे.'

'फुटपाथ चमकणाऱ्या डिवायडर, फ्लड गेट, अनेक गोष्टी या आधी वरळीत होत आहेत. फ्लड गेट पूर्ण मुंबईत पण बसवा. वरळी वरून सुसाट गाडी जी निघते ती सिलिंक वरून मातोश्रीला पोहचते. मुंबई सर्वांची आहे हे लक्षात ठेवा.' असं ही शेलार यांनी म्हटलं आहे.