मुंबई : अवयव दानाचं महत्व आपण सगळेच जाणतो. 24 वर्षीय महेश येरूरकर या तरूणाच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने पाच व्यक्तींना जीवनदान मिळालं आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
अवयव दानाने अनेकांनी जीवनदान मिळतं. यामुळे याचं महत्व अनन्य साधारण आहे. महेश येरूरकर या 24 वर्षीय तरूणाचा अपपघात झाला. अपघातानंतर ब्रेनडेड झाल्यावर तरूणाच्या कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे 5 व्यक्तींना जीवनदान मिळालं आहे.
अवयवदानात हृदय, 2 किडनी, 2 यकृत दान करण्यात आले. यामधील हृदय - जसलोक हॉस्पिटल, एक यकृत - अपोलो हॉस्पिटल, एक यकृत - ज्युपिटर हॉस्पिटल, एक किडनी - व्होकार्ड हॉस्पिटल, एक किडनी - जे जे हॉस्पिटलमध्ये अवयवदान करण्यात आलं. यामध्ये डॉ पल्लवी सापले, डॉ दीपक जोशी आणि डॉ संजय सुरसेसह टीममहत्वाचा वाटा आहे. या टीमच्या मार्गदर्शनाखाली अवयवदान करण्यात आले.
केईएममधील रुग्णालयात प्रथमच यशस्वीपणे अवयवदान करण्यात आले. ५२ वर्षीय व्यक्तीचे यकृत मंगळवारी दान करण्यात आले. पक्षाघाताचा झटका आलेला ५२ वर्षीय रुग्ण केईएम रुग्णालयात सोमवारी दाखल झाला होता. प्रकृती गंभीर असलेला हा रुग्ण मेंदूमृत झाल्यावर त्याच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मंगळवारी सकाळी रुग्णाचे यकृत आणि मूत्रपिंड दान करण्यात आले. यातील यकृत अपोलो रुग्णालयात साताऱ्याच्या रुग्णाला प्रत्यारोपित केले गेले. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी योग्य नसल्याने त्याचे मात्र प्रत्यारोपण होऊ शकलेले नाही.