खेळताना झोपाळ्याचा गळफास लागून मुलाचा मृत्यू

राकेशची आई घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.

Updated: Sep 6, 2018, 11:31 PM IST
खेळताना झोपाळ्याचा गळफास लागून मुलाचा मृत्यू title=

मुंबई: नालासोपाऱ्यात बारा वर्षाच्या मुलाचा झोपाळ्याचा गळफास लागून मृत्यू झाला. येथील पेल्हार बटरवाडा या भागात ही घटना घडली. राकेश यादव असे मृत मुलाचे नाव असून तो सहावी इयत्तेत शिकत होता. शाळेतून घरी आल्यानंतर आईच्या जुन्या साडीचा झोपाळा करून तो खेळत होता. खेळता खेळता अचानक फास आवळत गेला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी घरी कुणीही नव्हते. राकेशची आई घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.