मुंबई : बॉलिवूडचा 'दबंग हिरो' आणि सर्वांचा लाडका भाईजान याची हूबेहूब कॉपी करणारा आजम अन्सारी याला जामीन मिळाला. लखनऊच्या रस्त्यांवर सलमान खान (Salman khan) स्टाईलमध्ये स्टंट करताना त्याला पोलिसांनी अटक केली होती. आता हा डुप्लीकेट सलमान म्हणजेच आजम अन्सारी जेलबाहेर आला आहे. आजम अन्सारीने यावेळी सलमानला कॉपी करण्यामागचं कारण सांगितले.
आजम अन्सारी हा सलमानची इतकी स्टाईल कॉपी करतो की तो इन्स्टाग्राम आणि त्याच्या परीसरात 'डुप्लीकेट सलमान' म्हणून प्रसिद्ध आहे. सलमान खान (Salman khan) प्रमाणेच पोझ आणि स्टाईल मारत तो नेहमीच इन्टाग्रामवर व्हिडीओ बनवत असतो. असाच लखनऊच्या रस्त्यांवर व्हिडीओ बनवल्या प्रकरणी त्याला ठाकूरगंज पोलिसांनी अटक केली होती. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा आरोप त्याच्यावर होता. मात्र या प्रकरणी सोमवारी त्याला जामीन देण्यात आला आहे.
वजन घटवण्याची मिळाली प्रेरणा
आजमने सांगितले की त्याचे वजन 15 वर्षापूर्वी खूप वाढले होते. तब्बल वजन 128 किलोग्राम झाले होते. जी अत्यंत चिंतेची बाब होती. पण जेव्हा तो सलमानचा चाहता झाला आणि त्याचे सर्व चित्रपट पाहू लागला. तेव्हा त्याने सलमानसारखे फिट व्हायचे ठरवले. त्यानंतर तो जिममध्ये जाऊ लागला. आता त्याने काही प्रमाणात वजनही घटवले आहे. तसेच सलमानची स्टाईल हूबेहूब कॉपी करू लागला आहे. त्यामुळेच तो लखनऊमध्ये तो सलमानच्याच नावाने चर्चेत आला आहे.
सलमान सोबत व्हिडिओ बनवण्याची इच्छा
आजम अन्सारी रिअल इस्टेटचा व्यवयाय करतो. सलमानला एकदा तरी भेटून त्याच्यासोबत व्हिडीओ बनवण्याची इच्छा आहे. सध्या आझमचे इंस्टाग्रामवर सुमारे 1 लाख फॉलोअर्स आहेत. जिथे तूम्हाला सलमानच्या लोकप्रिय गाण्यांवर भरपूर रील्स पाहायला मिळतील. मात्र आता हा डुप्लीकेट सलमान खऱ्याखु्ऱ्या सलमानला भेटणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.