Ram Gopal Varma Post About Sridevi: आपल्या विधानांमुळे कायम वादात सापडणारे आणि चर्चेत राहणारे चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या एका पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटला आहे. अभिनेत्री श्रीदेवीच्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रेट रॉबरी, गोविंदा गोविंदा, हैराण यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. राम गोपाल वर्मा यांनी अनेकदा श्रीदेवीबरोबर काम करायला आपल्याला किती आवडतं याबद्दल जाहीरपणे भाष्य केलं आहे. रामगोपाल वर्मा यांनी यापूर्वी श्रीदेवी ही सर्वात हवी हवीशी वाटणारी महिला होती आणि ती देशातील सर्वात मोठी सुपरस्टार होती असंही म्हटलं होतं.
मात्र नुकताच राम गोपाल वर्मांनी त्यांच्या या सर्वात आवडत्या अभिनेत्रीसंदर्भात शेअर केलेल्या एका फोटोमुळे वादाला तोंड फुटलं आहे. राम गोपाल वर्मा यांची ही पोस्ट असवेंदनशील असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. निधन झालेल्या अभिनेत्रीसंदर्भात अशी पोस्ट करणं चुकीचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. राम गोपाल वर्मांनी शेअर केलेला मूळ फोटो हा एका चालकाबरोबरच असला तरी त्यामध्ये मॉर्फिंगच्या मदतीने श्रीदेवीचा चेहरा वापरण्यात आला आहे. म्हणजेच ओळखीच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एडिटींगच्या मदतीने श्रीदेवीचा चेहरा लावून हा एडीटेड फोटो वर्मा यांनी शेअर केला आहे.
राम गोपाल वर्मांची ही पोस्ट पाहून श्रीदेवीचे चाहते नाराज झाले आहे. हा श्रीदेवीचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. राम गोपाल वर्मा यांनी, 'मी तिला भेटायला स्वर्गात आलो आहे,' अशा कॅप्शनसहीत हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो एआय जनरेटेड असल्याचं सांगितलं आहे. या फोटोत राम गोपाल वर्मा ड्रायव्हर्स सीटच्या बाजूच्या सीटवर बसले असून ड्रायव्हींग सीटवर श्रीदेवी बसल्याचं दाखवण्यात आलं आहे. फोटोत राम गोपाल वर्मा सिगारेट ओढत असल्याचं दिसत आहे.
I just came to HEAVEN to visit HER https://t.co/HaPvjzjvMg
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 1, 2024
सामाज माध्यमांवर अनेकांनी राम गोपाल वर्मांनी श्रीदेवीचा अपमान केल्याचं सांगत या पोस्टचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल केला जात आहे.
श्रीदेवीचा 24 फेब्रुवारी 2018 रोजी आकस्मिक मृत्यू झाला. ती केवळ 54 वर्षांची होती. दुबईमधील एका हॉटेलमध्ये श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. श्रीदेवीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या यंत्रणांनी बरीच चौकशी केली. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांचीही चौकशी करण्यात आली. श्रीदेवी यांच्या मागे पती, दोन मुली असा परिवार आहे.