'टॉयलेट- एक प्रेम कथा' या चित्रपटातील '५' चुका !

अक्षय कुमारचा 'टॉयलेट- एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पाच दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८३.४५ करोडचा गल्ला केला आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 17, 2017, 03:08 PM IST
'टॉयलेट- एक प्रेम कथा' या चित्रपटातील '५' चुका ! title=
चित्रपटाने ८० करोडपेक्षा अधिक कमाई केली आहे.

नवी दिल्ली: अक्षय कुमारचा 'टॉयलेट- एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पाच दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८३.४५ कोट्यवधीचा गल्ला केला आहे. परंतु, चित्रपट बारकाईने पाहिल्यास त्यातील चुका नजरेस पडतात. तर जाणून घेऊया चित्रपटातील '५' चुका. 

१) पहिली चूक

 चित्रपटात असा एक सीन आहे त्यात भूमी पेंडणेकर अक्षयला सोडून जात आहे. जाताना ती ट्रेनने प्रवास करताना दाखवण्यात आले आहे. चित्रपटात दोघेही एकाच गावात राहणारे दाखवलेले असताना तिचा ट्रेनचा तो प्रवास काहीसा पचनी पडत नाही. 

toilet ek prem katha
 

२. दुसरी चूक 

होळीत झालेल्या लाठीमार दाखवताना भूमी अक्षयच्या डाव्या हातावर काठी मारत असते. परंतु रात्री ती जखम अक्षयच्या उजव्या हातावर दिसते आणि भूमी त्यावर मलमपट्टी करते. 

toilet ek prem katha
 

. तिसरी चूक 

ट्रेलरमध्ये अक्षय दिवसा भिंतीवर चढून भूमीला भेटायला जातो. परंतु, चित्रपटात हा सीन रात्रीचा दाखवण्यात आला आहे. 

toilet ek prem katha
 

४. चौथी चूक 

चित्रपटात एका सीनमध्ये भूमी आपल्या फ्रेंड्ससोबत रस्त्यावरून चालत असते. तेव्हा अक्षय मोबाईलवर बोलत तिथे पोहचतो आणि भूमीच्या मैत्रिणीला किती वाजले असे विचारतो. त्यावेळेस अक्षयकडे मोबाईल नसून तो फक्त कानावर हात ठेऊन बोलत असतो. हे स्पष्ट दिसते. परंतु, ते भूमीला कळत नाही. याचे आश्चर्य वाटते. 

toilet ek prem katha
 

. पाचवी चूक  

चित्रपटात अक्षय एका अधिकाऱ्याला भेटायला ऑफिसमध्ये जातो. तेव्हा जिना चढत असताना त्याचे हात रिकामे असतात. परंतु, लगेचच त्याच्या हातात एक फाईल पाहायला मिळते.

toilet ek prem katha