'बरेली की बर्फी'ची वाढती कमाई...

अभिनेता आयुष्मान खुराना कृति सेनन आणि राजकुमार राव यांच्यावर चित्रित सिनेमा 'बरेली की बर्फी' ने आतापर्यंत ११ कोटींची कमाई केली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 22, 2017, 04:08 PM IST
'बरेली की बर्फी'ची वाढती कमाई...  title=

नवी दिल्ली : अभिनेता आयुष्मान खुराना, कृति सेनन आणि राजकुमार राव यांच्यावर चित्रित सिनेमा 'बरेली की बर्फी' ने आतापर्यंत ११ कोटींची कमाई केली आहे.

याबद्दल सिनेमाचे निर्माते म्हणाले की, '१८ ऑगस्टला प्रदर्शित झाल्यावर 'बरेली की बर्फी' या चित्रपटाने त्याच दिवशी २.४२ कोटींचा गल्ला केला. त्यानंतर शनिवारी ३.८५ तर रविवारी ५.०३ कोटींची कमाई केली. म्हणजे सिनेमाने तीन दिवसात एकूण ११.३० कोटींचा गल्ला केला.'
 या सिनेमाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केले असून कथा त्यांचे पती नितेश तिवारी यांनी लिहिली आहे. सिनेमाचे वितरक तरण आदर्श यांनी सांगितले की, चित्रपटाने प्रदर्शित दिवसापासून चांगले यश मिळवले आहे. सोमवारी केलेल्या ट्वीटमध्ये आदर्श यांनी म्हटले आहे की, "सिनेमाने पुढील आठवड्यात देखील अशीच कामगिरी करण्याची गरज आहे."

 सिनेमामध्ये कृती एका छोट्या शहरातील मुलीची भूमिका करत आहे. तिच्या व्यक्तिरेखेचे नाव बिट्टी आहे. जिची मोठी स्वप्न आहेत. तिला ब्रेक डान्स खूप आवडतो. ती इंग्रजी सिनेमे बघते आणि व्हर्जिनिटीबद्दल मोकळेपणाने बोलते. 'बरेली की बर्फी'च्या लेखकाच्या शोधात बिट्टी आहे. तोच तिचा साथीदार होण्यासाठी योग्य आहे, अशी तिची धारणा आहे. 
 
सिनेमात आयुष्मान खुरानाची चिराग दुबे ही व्यक्तिरेखा असून जो बिट्टीच्या प्रेमात वेडा झाला आहे. तर राजकुमार राव यांनी प्रीतम विद्रोही ही व्यक्तिरेखा साकारली आहे.