मुंबई : अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारीत असलेला अर्जुन रामपालचा 'डॅडी' हा सिनेमा २१ जुलै ऐवजी ८ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या प्रिमिअरला अरुण गवळीची उपस्थिती असणार होती. पण त्याच्या या इच्छेवर पाणी फेरले आहे.
या सिनेमात अर्जुन रामपाल हा गवळींची भुमिका साकारत आहे. प्रदर्शनापुर्वीच हा सिनेमा चर्चेचा विषय बनला आहे. अरुण गवळीने या सिनेमाच्या प्रिमिअरला यावे यासाठी हरएक प्रयत्न केले जात होते. खुद्द अरुण गवळीचीही प्रिमिअरला येण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने पॅरोल रजेची विनंतीही केली होती. पण कोर्टाने गवळीला पॅरोल देण्यास नकार दिला. एका वेबसाईटवरच्या बातमीनुसार गवळी यानी गणेशोत्सावासाठी पॅरोल मागितली होती. दरम्यान चित्रपटही पाहण्याचा त्याचा विचार होता. परंतू अधिकाऱ्यांनी गवळीला पॅरोल दिलाचं नाही. त्यामुळे गवळीच्या उपस्थितीशिवायच अर्जुन रामपालला सिनेमाचा प्रिमिअर उरकावा लागणार आहे.
सिनेमाच्या प्रीमिअरला तुरुंगात असलेल्या गवळीची उपस्थिती असली तर समाजात वेगळाच संदेश जाईल.
त्यामुळे न्याय व्यवस्थेला डाग लावण्यासारखं असल्याचे सांगण्यात आले आहे.