ZEENIA AI Survey:महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला मिळेल स्पष्ट बहुमत? कोण किंगमेकर? पाहा मतदारांचा कौल!

ZEENIA AI Survey: राज्यातील 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात  महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकलाय यांचा अंदाज घेण्यात आला .

Pravin Dabholkar | Updated: Aug 16, 2024, 05:05 PM IST
ZEENIA AI Survey:महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला मिळेल स्पष्ट बहुमत? कोण किंगमेकर? पाहा मतदारांचा कौल! title=
महाराष्ट्रात कोण ठरणार किंगमेकर?

ZEENIA AI Survey: महाराष्ट्र विधानसभा निवडणुक दोन महिन्यांवर आली असताना  झी 24 तासनं विधानसभेचा सर्वात मोठा AI सर्व्हे केला आहे. पहिली मराठी AI अँकर ZEENIA हा सर्व्हे जाहीर करणार आहे. या सर्व्हेत आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात आला आहे. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व्हे तयार केला आहे. राज्यातील 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात  महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकला आहे. यांचा अंदाज घेण्यात आला आहे.महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला स्वबळावर बुहमत मिळण्याची शक्यता असं वाटतं? असा प्रश्न महाराष्ट्रातील मतदारांना विचारण्यात आला. राज्यातील 288 मतदार संघातील मतदारांनी यावर आपले मत नोंदवले आहे. 

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचे महायुतीचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीच महायुती सरकारला अपेक्षित असे यश मिळाले नाही. दरम्यान महायुती सरकारने जनतेसाठी लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. असे असले तरी त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होतील. दरम्यान निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल? महायुती किंवा महाविकास आघाडी यांना सत्तेत येण्यासाठी मनसे, वचिंत हे किंगमेकर ठरतील? अशा विविध प्रश्नांवर जनतेने कौल दिला आहे.

तिसरी आघाडी प्रभावी ?

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला स्वबळावर बुहमत मिळण्याची शक्यता असं वाटतं? या प्रश्नावर उत्तर देताना 38 टक्के मतदारांनी भाजपच्या बाजुने कौल दिला.  22 टक्के मतदारांनी शिवसेना शिंदे गटाच्या बाजून कौल दिला. शिवसेना ठाकरे गटाला बहुमत मिळेल असे मत 17 टक्के जणांनी नोंदवले. काँग्रेसला बहुमत मिळेल असे मत 14 टक्के जणांनी नोंदवले तर  
राष्ट्रवादी पवार गटाला स्वबळावर बहुमत मिळेल अशी मत 9 टक्के जणांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात ओबीसी, वंचित, मनसे किंवा तिसरी आघाडी प्रभावी ठरेल का? असा प्रश्न महाराष्ट्रातील मतदारांना विचारण्यात आला. यावर 60 टक्के मतदारांना हा फॅक्टर काम करेल असे वाटते. तर 30 टक्के लोकांना याचा प्रभाव दिसेल असे वाटत नाही. 10 टक्के लोकांनी याबद्दल काही सांगता येणार नाही असे मत नोंदवले आहे. 

किंगमकर कोण?

कुठल्याही आघाडीला बहुमत न मिळाल्यास किंगमकर कोण ठरु शकेल? हा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला. यावर 45 टक्के लोकांना अपक्ष किंगमेकर ठरतील असे वाटते. तर छोटे पक्ष किंगमेकर ठरतील असे 30 टक्के जणांना वाटते.  25 टक्के जणांनी सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली. 

ZEENIA AI Survey: कशी आहे शिंदे फडणवीस-अजित पवार सरकारची कामगिरी? 40 टक्के लोकांना वाटतं...

कोणत्या आधारावर सर्व्हे?

मतदारांच्या मनातील प्रश्नांच्या आधारे हा सर्व्हे तयार करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय चित्र बदललं? महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोणाचं राज्य येणार? लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरणार? मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती मिळणार? विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा असणार का? महाराष्ट्रात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होणार? हे आणि महाराष्ट्रातील मतदारांशी निगडीत असलेल्या प्रश्नांवर हा सर्व्हे तयार करण्यात आला आहे. 

(डिस्क्लेमर- वरील माहिती ही 'झी 24 तास'ने महाराष्ट्राच्या 288 मतदार संघात जाऊन केलेलं सर्व्हेक्षण आहे. हा कोणत्याही प्रकारचा निकाल नसून जनमताचा कौल आहे.)