मुंबई : देशभरात नवरात्रीचा सण (Navaratri Festival) उत्साहात साजरा होत आहे. नागरीक गरब्याच्या तालावर नाचून नवरात्रीच्या (Navaratri) नऊ दिवसांचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. या संदर्भातले अनेक व्हिडीओही देखील समोर आले आहेत. त्यात आता आणखीण एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे.
देशात कोणताही सण असो तो मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) साजरा होतोच. मग तो दहीहंडी असो, अथवा दसरा असो, मुंबईचे असंख्य प्रवासी हा सण लोकलमध्ये उत्साहाने साजरा करताना दिसतात. असाच आता नवरात्री सण (Navaratri Festival) देखील लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) साजरा होत आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
व्हिडिओत काय?
हा व्हिडिओ मुंबईच्या लोकल ट्रेनमधला (Mumbai Local Train) आहे. या लोकल ट्रेनमध्ये महिला गरबा खेळताना दिसत आहे. लोकल ट्रेनमध्ये भर गर्दीत या महिला गरबा खेळतायत. नुसतं लोकलचं नाव जरी डोळ्यासमोर आलं तरी गर्दीचा फोटो डोळ्यासमोर येतो. त्यामुळे प्रवाशांना पाय ठेवायला जागा नसल्याने गर्दीत महिला गरबा कसा खेळतायत,असा प्रश्न अनेकांना पडतोय. मात्र तरीही या महिला गरबा (Women Garba) खेळताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय.
मुंबईत असंख्य महिला अशा आहेत, ज्या घर सांभाळत ऑफिसमध्येही काम करतात. यामुळे त्यांना सणवार साजरं करण्यास फारचं कमी वेळ मिळतो. त्यामुळे या महिला अनेकदा लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) सण साजरा करताना दिसतात. या घटनेत ही तसेच झाले आहेत. घर आणि ऑफिसच्या जबाबदारीतून वेळ मिळत नसल्याने महिला चालत्या लोकल ट्रेनमध्ये गरबा (Mumbai Local Train Garba) खेळताना आहेत. महिलांच्या या लोकल ट्रेनमधील गरब्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
#Garba #Navrathri
MUMBAI LOCALS CREATE MOMENTS
Now in yesterday's 10.02 am #AClocal from Kalyan.
FUN HAS NO LIMIT. pic.twitter.com/Hruzxwbeqr— Mumbai Railway Users (@mumbairailusers) September 28, 2022
दरम्यान मुबंईच्या लोकल ट्रेनमध्ये दररोज भांडण, हाणामारीच्या घटना घडत असतात. त्यात असा महिला गरबा खेळत असल्याचा व्हिडिओ (Garba video) पाहुन अनेकांना सुखद धक्का बसला आहे. तसेच लोकल ट्रेनमधील गरब्याचा व्हिडिओ (Mumbai Local Train Garba) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.