संतापजनक प्रकार, प्रसुतीसाठी महिलेला झोळीतून नेण्याची वेळ

women Delivery at Forest at Pernoli : कोल्हापूरच्या पेरणोली धनगरवाड्यावर सरकारनं शरमेने मान खाली घालावी अशी घटना घडली. 

Updated: Feb 23, 2022, 09:59 AM IST
संतापजनक प्रकार, प्रसुतीसाठी महिलेला झोळीतून नेण्याची वेळ title=

कोल्हापूर : women Delivery at Forest at Pernoli : कोल्हापूरच्या पेरणोली धनगरवाड्यावर सरकारनं शरमेने मान खाली घालावी अशी घटना घडली. प्रसुतीसाठी महिलेला झोळीतून नेण्याची वेळ आली. दरम्यान, वाटेतच ओढ्याकाठी ती प्रसुत झाली. (women Delivery at Forest at Pernoli in Kolhapur)

त्यानंतर तान्हुलीसह तरीही तिचा प्रवास सुरुच राहिला. जिथे रस्ता तयार आहे तिथे अॅमेबेयुलन्स येऊन थांबलेली. तिथून पुढे बाळ बाळंतीण उपचारासाठी निघाल्या. पण ही आजची घटना नाही. या भागात ना लाईट ना रस्ते, मग आरोग्य सुविधांचा तर विचारही करू शकत नाही. त्यामुळे 108 नंबरची अॅम्ब्युलन्सही येत नाही.

आता आणि याआधीही आजारी माणसाला, गर्भवती महिलेला असेच झोळीतून न्यावे लागते. लाईटसाठी खांब लागले पण वनविभागाचे धोरण आडवे आले आहे. घनदाट जंगलातून जाताना जंगली प्राण्यांचीही भीती येथील नागरिकांच्या पाचवीलाच आहे.