नवी मुंबई : सर्वात धक्कादायक घटनासमोर आली आहे, एका महिलेवर लोकलमध्ये अत्याचार करण्यात आले, यानंतर तिला रुळावर फेकून देण्यात आलं. सुदैवाने आता या महिलेची प्रकृती स्थिर आहे, वाशी खाडी पुलाजवळ हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेतील आरोपींना शोधून काढणे हे पोलिसांसमोर आता मोठं आवाहन आहे. विशेष म्हणजे लोकलच्या मोटरमनला ही महिला पहाटे जखमी अवस्थेत रूळानजीक दिसून आली.
नवी मुंबईतील वाशी खाडी पुलाजवळ अज्ञातानं तरुणीवर अत्याचार करुन लोकल मधून फेकून दिलं आहे. मंगळवारी पीडिता रुळावर जखमी अवस्थेत आढळून आल्यानतंर हा प्रकार समोर आला. ही तरुणी नवी मुंबईत राहते आणि तिथेच घरकाम करते. शनिवारी टिटवाळ्याला तिच्या आई वडिलांच्या घरी गेली होती. तिथून ती रविवारी थेट पवईला गेली.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका मोटरमनला पीडिता जखमी अवस्थेत रुळावरूनआढळली. त्यानंतर स्टेशनमास्तरांच्या मदतीनं तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पीडितेची प्रकृती सध्या स्थीर आहे. मात्र अजुनही पीडिता बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.