पुणे : रूबी हॉस्पिटलमध्ये ८५ दिवस कोमात असलेल्या एका महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात आली आहे.
मूळची मध्यप्रदेशातील प्रगतीला मधूमेहाचा त्रास होता. साडे तीन महिन्यांच्या गर्भवती प्रगतीला बेशुद्द अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खासगी रुग्णालयात प्रगतीवर होत असलेल्या उपचारांवर काहीच सकारात्मक परिणाम होत नसल्याने अखेर पुण्याच्या रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
17 आठवड्यांची गर्भवती असल्यापासून डॉक्टरांनी तिच्या आरोग्याबाबत आणि डाएटबाबत खास प्लॅन बनवला. त्यानुसार प्रगतीची काळजी घेण्यात आली. सुरूवातीला अतिदक्षता विभागात असलेल्या प्रगतीला कालांतराने जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. तिने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. ८५ दिवसानंतर प्रगती पहिल्यांदा बोलली.
जुलै महिन्याच्या अखेरीस प्रगतीने एका मुलीला जन्म दिला. याप्रसुतीमध्ये डॉक्टरांना आई आणि बाळ या दोघांनाही वाचवण्यात यश आले. प्रगतीच्या नातेवाईकांनीही डॉक्टरांचं कौतूक करत पंतप्रधान मोदी आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.