Shivsena NCP MLA Disqualification Case In Supreme Court of India : शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याचा निकाल पुन्हा लांबणीवर पडलाय.. दिवाळीनंतर महाराष्ट्रात निवडणूका होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. साधारणपणे 45 दिवस आचारसंहिता लागते. म्हणजे सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू शकते. गेल्या सुनावणीत सरन्यायाधिशांनी निकालाचे संकेत दिले होते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याचा निकाल दिवाळीच्या अगोदर तरी लागतो का याची प्रतीक्षा आहे..
महाराष्ट्राच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. दोन्ही पक्षांचे खटले चंद्रचूड यांच्यासमोर आहेत. चंद्रचूड निवृत्तीपूर्वी ही दोन प्रकरणं निकाली काढतील का ? याची प्रतिक्षा आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी न्यायमूर्ती संजीव खन्ना भारताचे पुढचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ 11 नोव्हेंबर 2024 ते 13 मे 2025 पर्यंत असेल. तर चंद्रचूड यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारीला दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेलाय. या प्रकरणी सातत्यानं तारीख पे तारीख पाहायला मिळत आहे.
या प्रकरणात 30 जुलै आणि 21 ऑगस्टला सुनावणी अपेक्षित होती. मात्र, सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यानंतर हे प्रकरण 3 सप्टेंबरला सुनावणीसाठी आलं . त्यानंतर ठाकरे यांच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शन केल्यानंतर या प्रकरणावर, 6 ऑगस्टला सुनावणीची शक्यता होती. या प्रकरणी 14 ऑगस्टला सुनावणीची तारीख आली होती. मात्र त्यानंतर 17 सप्टेंबर ही नवीन तारीख आली. 21 ऑगस्टला सुनावणीची नवीन तारीख आली… मात्र,21 ऑगस्टला संवैधानिक पिठाची सुनावणी असल्यानं सुनावणी झाली नाही. पुन्हा 3 सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. मात्र, 3 सप्टेंबरला न्यायाधीश उपलब्ध नसल्यानं 5 सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. मात्र, 5 सप्टेंबरला न्यायाधीश नसल्यानं आता 10 सप्टेंबरची तारीख देण्यात आली. विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड 10 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहे. त्या दिवशी रविवार असल्यामुळे दोन दिवसापूर्वीच म्हणजे शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी चंद्रचूड सेवेतून निवृत्त होतील. त्यापूर्वी तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या मालकीचा प्रश्न निकाली लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.