नागपूर : राज्याची उपराजाधी नागपुरात ( Nagpur) एक धक्कादायकबाब उघड झाली आहे. एका 64 वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा होत नव्हता. मात्र, अखेर या हत्येचा (Murder) उलगडा झाला आहे. धक्कादायकबाब म्हणजे 31 वर्षीय पत्नीनेच त्याची हत्या केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, हा हत्येसाठी तिने क्लृप्ती लढवली आणि पतीचा काटा काढला. पतीला 'कुछ नया करते है' असे म्हणत तिने मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखवत त्याचे हात खुर्चीला बांधले. त्यानंतर पत्नीने पतीचा गळा चिरला.
शहरातील रजत संकुल येथे 9 मार्चला झालेल्या लक्ष्मण मलिक (64) ( Laxman Malik) या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा झाला. लक्ष्मण मलिक यांची हत्या त्यांच्याच 31 वर्षीय पत्नीने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, याशिवाय लक्ष्मण मलिक यांच्या चार पत्नी असल्याची माहिती लोकांकडून मिळत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.लक्ष्मण मलिक आणि 31 वर्षीय पत्नी या दोघांमध्ये मुलाच्या ताबा घेण्यावरून वाद होता. या वादातून त्यांच्या खडाजंगी होत असे. त्यानंतर पतीचा काटा काढण्याचा पत्नीने कट रचल्याचे पुढे आले आहे.
दोघांमध्ये वाद असला तरी मात्र दोघांमध्ये संवाद सुरु होता. 8 मार्चला घटनेच्या दिवशी लक्ष्मण मलिक यांची हत्या करण्याच्या इराद्यानंच 31 वर्षीय पत्नीने गोकुळपेठ येथून रजत संकुल येथील लक्ष्मण मलिक सध्या वास्तव्यास असलेल्या फ्लॅटवर आली. तिने फ्लॅटवर येवून मोबाईलवर काही अश्लील चित्रफीत दाखवत "कुछ नया करते है" असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. यावर विश्वास ठेवत लक्ष्मण मलिक यांना खोलीत नेले.
अश्लील चित्रफीत दाखवत "कुछ नया करते है" म्हणत लक्ष्मण यांचे हात खुर्चीवर पाठीमागून बांधले. तिच्या प्रलोभनाला लक्ष्मण मलिक चांगलेच भाळले. मजबूत शरीरयष्टीच्या लक्ष्मण मलिक याचे हात खुर्चीच्या मागे बांधल्यानंतर चित्रफीत बघत असताना बेसावध होताच 31 वर्षीय पत्नीने तीक्ष्ण हत्याराच्या मदतीने त्यांचा गळा चिरुन त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांची पत्नी निघून गेली. दुसऱ्या दिवशी 9 मार्चला लक्ष्मण मलिक राहत असलेल्या फ्लॅटमध्ये त्यांचे मित्र आल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात दिसले. खुर्चीवर हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत त्यांची गळा चिरून हत्या झाल्याचे आढळून आल्यामुळे खळबळ उडाली.
पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर लक्ष्मण मलिक यांचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे समोर आले.दरम्यान पत्नीचे दुसऱ्या पुरुषाही संबंध असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा मिळाली. त्यातूनच मग या हत्येचा उलगडा झाला.