संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट, भोंगा, हनुमान चालीसा कशासाठी? सत्तेसाठी त्यांची 'ही' तयारी सुरु

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मोठा गौप्यस्फोट केलाय. नकली ओवेसी आणि खरा ओवेसी यांचा प्लॅन त्यांनी उघड करून एकच खळबळ माजवली...

Updated: Apr 16, 2022, 03:41 PM IST
संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट, भोंगा, हनुमान चालीसा कशासाठी? सत्तेसाठी त्यांची 'ही' तयारी सुरु title=

नाशिक : काल कुणी तरी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचू असा इशारा दिला. पण, ज्यांनी ही धमकी दिलीय त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आज हनुमान जयंती आणि सगळीकडे हनुमान चालीसा, भोंगे वाजताहेत. पण, ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले त्याने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे. 

आज हजारो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले. तिकडे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल लागला. निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला. याच काळात काही लोकांनी भोंगे, हनुमान चालीसा यावरून घाणेरडे राजकारण सुरु केले.

आज पोथ्या वाचताना काही जणांचे फोटो समोर आले. हनुमानाचे हे इतके मोठे भक्त आहेत तर हनुमान चालीसा यांना पाठ असायला हवी होती. आज हे हे काही चालू आहे. त्यातील अनेकांना राष्ट्रगीत, वंदे मातरंमही म्हणता येत नाही. मी अक्खी हनुमान चाळीस वाचून दाखवतो. भीमरूपी हनुमान आमच्या मागे आहे हे कोल्हापूर जनतेने दहवून दिले आहे असेही ते म्हणाले. 

पण, या निवडणुकीत जनतेने त्यांचा पराभव करून त्यांचे भोंगे खाली उतरविले. तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण, त्याचा फायदा झाला नाही. भाजपने नवं हिंदुत्ववादी एमआयएमचे ओवेसी यांच्याकडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना प्रमुख यांची कॉपी करण्याचा प्रयत्न काहींनी केला. 

भोंग्याचे राजकारण कुणाचे आहे आणि त्यामागे कोण आहे हे जनतेने दाखवून दिले आहे. शिवसेनेने हिंदुत्वाची निवडणूक काही आताच लढविली नाही. विलेपार्ले येथे शिवसेनेने जिकलेली पहिली निवडणूक तेव्हापासून हिंदुत्वाचा मुद्दा आमचा आहे.

कोल्हापुरात भाजपचा प्रभाव झालाय आता कोण हिमालयात जातंय ते पाहू. या निकालामुळे भोंग्याचे राजकारण संपलं आहे. रामनवमी, हनुमान जयंती हे काही आताचे नाही. आपण वर्षानुवर्षे भारतात हे सण साजरे करत आहोत. पण, याच वर्षी १० राज्यात दंगली झाल्या. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि निवडणूक जिंकायच्या असे हे त्यांचे राजकारण आहे.

महाराष्ट्रातही भाजपची सत्ता आणण्यासाठी एक मोठे षडयंत्र रचले गेले आहे. काहीही केले तरी सत्ता येत नाही. महाविकास आघाडीत फूट पडत नाही. लोक अशांत होत नाही. त्यामुळे मशिदींसमोर भोंगे वाजविण्यासाठी काहीजणांना सुपाऱ्या द्यायच्या अशी त्यांची योजना आहे. 

इथे नकली ओवेसी बोलू लागला की इकडून खरा ओवेसी येणार आणि ते दोघे महाराष्ट्रात दंगली घडवून आणणार. दंगली झाल्या की ते राज्यपाल यांच्याकडे जंतर. तिथें केंद्राला अहवाल पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवट आणणार आणि महाराष्टात भाजपची सत्ता आणणार, असे हे षडयंत्र आहे. ही माहिती गुप्तचर विभागाकडून मिळालीय असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x