गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे मिळतात, मग गोविंद यांच्या हत्येचे का नाही - मेघा पानसरे

  गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीला अनेक धागेदोरे मिळतात. मग पानसरे यांच्या हत्येचे का नाहीत?

Updated: Jun 16, 2018, 07:26 PM IST
गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे मिळतात, मग गोविंद यांच्या हत्येचे का नाही - मेघा पानसरे title=

कोल्हापूर : पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीला अनेक धागेदोरे मिळतात. मग महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या एसआयटीला असे यश का मिळत नाही, असा  सवाल ज्येष्ठ विचारवंत क्रॉ. गोविंदराव पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांनी उपस्थित केलाय. कर्नाटक एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार गौरी लंकेश हत्या प्रकरणात, कोणत्या एका संस्थेचा थेट संबध असल्याचा पुरावा मिळाला नसल्याचं म्हटलय, पण मारेकरी हे उजव्या विचार सरणीचे आहेत हे मात्र त्यांनी आधोरेखीत केलय हे देखील महत्वाचं असल्याच मेघा पानसरे यांनी म्हटलंय.