महाराष्ट्रात आहे भारतातील दुसरा ताजमहल; औरंगजेबाच्या बायकोसाठी कुणी बांधल हे प्रेमाचं प्रतिक?

Maharashtra Tourism: महाराष्ट्रातही सेम टू सेम आग्र्यासारखा ताजमहल आहे. हा मिनी ताज बिवी का मकबरा नावाने ओळखला जातो. 

वनिता कांबळे | Updated: May 21, 2024, 12:39 PM IST
महाराष्ट्रात आहे भारतातील दुसरा ताजमहल; औरंगजेबाच्या बायकोसाठी कुणी बांधल हे प्रेमाचं प्रतिक? title=

Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar : ताजमहल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. आयुष्यात एकदा तरी तरी हातात हात धरुन ताजमहलसमोरल जोडीने फोटो काढायचा अशी इच्छा अनेक जोडप्यांच्या मनात असते. बादशहा शहाजहॉंने आपली प्रिय राणी मुमताज बेगमच्या स्मृत्यर्थ ताजमहाल बांधला. यमुना नदी किनारी वसलेल्या आग्रा शहरात प्रेमाचे प्रतीक असलेले 'ताजमहल' प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक आहे. जगातील सात आश्चर्यांपैंकी ताजमहल हे एक आहे. जगभरातील पर्यटक ताजमहल भेट देतात. महाराष्ट्रातही  सेम टू सेम दिल्लीसारखा ताजमहल आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेली सुंदर वास्तू 'बीबी का मकबरा' या नावाने ओळखली जाते. ही वास्तू म्हणजे ताजमहलची प्रतिकृती आहे. 

औरंगाबाद अर्थात  छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते.  52 दरवाजाचे शहर अशी देखील छत्रपती संभाजीनगरची ओळखल आहे. पानचक्की, मुघलकालीन दरवाजे, सोनेरी महल, वेरुळ अजिंठा लेणी, बुद्ध लेणी अशा विविध पर्यटनस्थळांसाठी  छत्रपती संभाजीनगर ओळखला जाते. यासह बीबी का मकबरा हे पर्यटनस्थळ देखील तितकेच लोकप्रिय आहे.  बीबी का मकबरा हे दिल्लीच्या ताजमहलची प्रतिकृती आहे. 

महाराष्ट्राचा मिनी ताज 

बीबी का मकबरा हे महाराष्ट्राचा मिनी ताज म्हणीन ओळखला जातो. बीबी का मकबरा  ही अतिशय सुंदर वास्तू आहे. दिल्लीतील ताजमहल प्रमाणेच याची रचना आहे. यामुळेच अनेक पर्यटक याला आवर्जून भेट देतात.

महाराष्ट्रात कोणी उभारले हे प्रेमाचे प्रतिक?

औरंगजेबाची बायको रबिया-उद-दुर्रानी उर्फ दिलरास बानो बेगमच्या स्मरनार्थ हा बीबी का मकबरा उभारण्यात आला आहे. औरंगजेब नाही तर त्याच्य मुलाने हा बीबी का मकबरा उभारला आहेय  औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम हीचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. बानो बेगमला जिथं दफन करण्यात आलं तिथेच  हा बीबी का मकबरा आहे. बानो बेगमला दफन केलेल्या ठिकाणी औरंगजेबाचा मुलगा आझमशाहने हा मकबर बांधला. हा मकबरा बीबी का मकबरा नावाने ओळखला जातो.  बीबी का मकबरा पाहताना दिल्लीचा ताजमहल आठवतो. कारण बीबी का मकबरा हा हुबेहुब ताजमहलसारखा दिसतो.  

345 वर्ष जुनी वास्तू 

इसवी सन 1679 मध्ये बीबी का मकबरा बांधण्यात आला. ही ऐतिहासिक 345 वर्ष जुनी आहे. अत उल्ला यांनी बीबी का मकबरा बांधला. मकबऱ्याच्या उभारणीसाठी खास जयपूरमधून संगमरवरी दगड आणण्यात आले होते. त्यासाठी दीडशेपेक्षा जास्त वाहनांचा वापर करण्यात आला. मकबऱ्या भोवती मोठी बाग आहे. या बागेच्या मधोमधच हा मकबरा आहे. यामुळे ही वास्तू दिसायला खूपच आकर्षक दिसते. 

जायचे कसे?

बीबी का मकबरा हा छत्रपती संभाजीनगरपासून 3 किमी अंतरावर आहे. राज्य परिवहन बस किंवा खासगी टॅक्सीद्वारे इथ पर्यंत जाता येते.  10 किमी अंतरावर  औरंगाबाद चिखलठाणा विमानतळ आहे. तर, जवळचे रेल्वे स्टेशन औरंगाबाद आहे. रेल्वे स्टेशनपासून बीबी का मकबरा 36 किलोमीटर दूर आहे.