राज्यातली थंडी गायब, या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं संकट, बळीराजा चिंतेत

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचं धुमशान सुरू आहे. राज्यात आणखी 4 ते 5 दिवस पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला 

Updated: Nov 18, 2021, 04:50 PM IST
राज्यातली थंडी गायब, या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं संकट, बळीराजा चिंतेत title=

मुंबई: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचं धुमशान सुरू आहे. राज्यात आणखी 4 ते 5 दिवस पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. 

तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस झाला आहे. 

या अवकाळी पावसानं राज्यात धुमशान घातल्याने द्राक्ष, स्ट्रॉबेरी, आंबा- काजू शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने पाऊस कोसळणार आहे. राज्यात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत राज्यात मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस झाला.

पावसामुळे कापणीला आलेलं पीक धोक्यात आहे. पावसाळी हवेमुळे द्राक्ष, स्ट्रॉबेरी, आंबा, काजू उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. पावसामुळे थंडी गायब झालीय. अरबी समुद्रातलं कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्र, गोव्याकडे सरकत आहे.

पनवेल, नवी मुंबई मधील काही भागात भर दुपारी पावसाने हजेरी लावली, पनवेल मधील खारघर, कामोठे, नवी मुंबई मध्ये पावसाच्या सरी बरसल्या. तर बेलापूर ,नेरुळ भागातही पाऊस पडला, त्यामुळे वाहतूकीचा वेगही काहीसा मंदावला होता. अचानक पाऊस आल्यानं नागरीकांची तारांबळ उडाली, मात्र हवेत थोडा गारवा निर्माण झाला आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी शिक्रापूर परिसराला रात्री अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळी पावसाने शेतीचं काही ठिकाणी नुकसान झालं. तर काही ठिकाणी हा पाऊस पिकांना वरदान ठरला आहे. ज्वारी हरभरा यांसारख्या पिकांना हा पाऊस वरदान ठरला आहे.

निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरात अवकाळी पावसाने 15 ते 20 मिनिटं जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे काढणीला आलेल्या शेतीमालाचं तसंच गहु आणि द्राक्ष बागेचं नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला