औरंगाबादमध्ये कचऱ्यानंतर पाणी समस्या, टॅंकर पाणीपुरवठा बंद

औरंगाबाद महापालिकेकडून गेल्या ३५ दिवसांपासून कचरा प्रश्न सुटला नाही. त्यात आता आजपासून शहरातील काही भागात ८० टँकरनं होणारा पाणीपुरवठा बंद पडलाय. 

Surendra Gangan Updated: Mar 23, 2018, 08:36 PM IST
औरंगाबादमध्ये कचऱ्यानंतर पाणी समस्या, टॅंकर पाणीपुरवठा बंद title=
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : महापालिकेकडून गेल्या ३५ दिवसांपासून कचरा प्रश्न सुटला नाही. त्यात आता आजपासून शहरातील काही भागात ८० टँकरनं होणारा पाणीपुरवठा बंद पडलाय. टँकर कंत्राटदाराचं थकीत बिलाचे जवळपास ७० लाख रुपये न मिळाल्यानं  हा पुरवठा बंद पडलाय. त्यामुळं अनेक भागात पाण्याचा ठणठणाट होणार आहे.  

त्यात महत्वाचं म्हणजे हा प्रश्न सोडवणारे अधिकारी पदाधिकारीही महापालिकेत उपलब्ध नाहीत. प्रभारी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी बैठकांसाठी मुंबईत तर  पाणीपुरवठाचे मुख्य अभियंता दिल्लीत आहेत. 

महापालिका चीफ फायनान्स अधिकारी सुट्टीवर असल्याची चर्चा आहे. तर महापौरही तीन दिवसांच्या सुट्टीवर अमृतसरला गेल्याची माहीती मिळतेय. अजून कचरा प्रश्नही सुटला नाही तर अनेक भागात आता टँकर बंद झाल्यानं पाणीप्रश्न पेटणार आहे.