किनारपट्टीवर वाऱ्याचा प्रचंड वेग, मासेमारीला ब्रेक

कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीला ब्रेक लागला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.  

Surendra Gangan Updated: Mar 23, 2018, 04:46 PM IST
किनारपट्टीवर वाऱ्याचा प्रचंड वेग, मासेमारीला ब्रेक  title=
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीला ब्रेक लागला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कमी दाबाच्या पट्याचे परिणाम आता कोकण किनारपट्टीवर जाणवू लागले आहेत. बुधवारी दुपारनंतर सुटलेल्या वाऱ्याचा प्रचंड वेग आजही कायम आहे. 

 मतलई वाऱ्यामुळे मासेमारी धोक्यात

कोकण किनारपट्टीवर सुटलेल्या या मतलई वाऱ्यामुळे मच्छीमारी अडचणीत आले आहे. त्यामुळे मच्छीमारी नौका या रत्नागिरीच्या मिरकरवाडा  बंदरात उभ्या राहील्यायत.तर मासेमरीसाठी गेलेल्या नौकांनी जवळच्या बंदरात आश्रय घेतलाय.

 नौका रत्नागिरीच्या बंदरांमध्ये 

कोकणसह मुंबई, गुजरात, कर्नाटकमधील सातशे नौका सध्या आश्रयासाठी रत्नागिरीच्या बंदरांमध्ये दाखल झाल्या आहेत. यावर्षी मासेमारी हंगाम सुरु झाल्यापासून वारंवार हवामान बदलांना सामोरे जावं लागत आहे. 

 वाऱ्यांचा वेग कायम राहणार

पुढील २४ तास हवामान खात्यानं मतलई वाऱ्यांचा वेग कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मच्छिमारांसमोर निसर्गाचं संकट उभं राहिलंय.